Guest Visits

Curtain Raiser Event - 10th August 2016

French Evening - 17th August

Guest With Hosts


फ्रान्स मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांना पुण्यात प्रारंभ !
----------------------
पुणे :
‘फ्रान्स मित्र मंडळा’च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांना 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात  शुभारंभ झाला . 
या शुभारंभ कार्यक्रमास फ्रान्समधून आलेले  10 जणांचे शिष्ट मंडळ,त्यांचे प्रमुख लिओपाल्ड , प्रतापराव पवार,उप महापौर मुकारी अलगुडे   ,डॉ. सतीश देसाई ,अंकुश काकडे ,मंडळाच्या सचिव भारती भिडे ,जयंत शाळीग्राम ,डॉ  उल्हास जोशी ,माणिक कोतवाल ,डॉ दीपक मांडे ,उपस्थित होते . प्रास्ताविक डॉ  सतीश देसाई  यांनी केले 
कार्यक्रमात ‘फ्रान्स मित्रमंडळ’चा लोगो, वेबसाईट आणि माहितीपत्रकाचे प्रकाशन झाले . 'बॉंजूर ' या मासिकाचे प्रकाशन झाले . महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग असलेल्या मंगळागौर खेळांची प्रात्यक्षिके पाहुण्यांना दाखविण्यात आली . ‘मनस्विनी’ संस्थेने या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले . लोगो तयार करणाऱ्या आयुषी दुबे आणि इतर स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला . डॉ  उल्हास जोशी  यांनी आभार  मानले . दोन्ही देशांच्या राष्ट्र गीतांनी समारोप झाला . 
फ्रेंच नागरिकांची भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्याची वृत्ती पाहून पुण्यात 'विद्यार्थी सहायक समिती ' स्थापन झाली असे सांगून  प्रतापराव पवार म्हणाले ,'इसिस सारख्या गटांकडून व्यक्त होणारी द्वेष यासारख्या गोष्टी हा मानवतावाद नाही ,तर फ्रान्स मित्र मंडळ सारख्या संस्थांकडून होणारे उपक्रम हा मानवतावाद आहे . सामान्य माणसाला हेव्या -दाव्यांमध्ये रस नसतो तर चांगुलपणा जपण्यात रस असतो . सार्वजनिक काम करणे हाच  पुण्याचा डीएनए आहे '
महापौरांच्या वतीने बोलताना अंकुश काकडे म्हणाले ,'पुणेकरांनी ५० वर्षे मैत्री टिकवली हेच कौतुकास्पद आहे .पुणे पालिका या उपक्रमांना मदत करेल . ' उप महापौर मुकारी अलगुडे यांनीही उपक्रमाचे  कौतुक करून सुवर्ण महोत्सवाला  शुभेच्छा  दिल्या  आणि  पालिकेतर्फे फ्रान्स  शिष्ट मंडळाचा  सत्कार  करण्यात  येईल असे  सांगितले . 
. रुपाली मेमाणे ,प्रसाद  बर्वे यांनी  सूत्रसंचालन केले . 
 
‘फ्रान्स मित्रमंडळ’ हे 50 वर्षांपूर्वी फादर दलरी, अच्युतराव आपटे, निर्मलाताई पुरंदरे यांनी स्थापन केले. दोन्ही देशांमध्ये जाणे-येणे, आदान-प्रदान वाढावे, संस्कृती-परंपरांची माहिती व्हावी हा त्यामागील उद्देश होता. पुण्यातून फ्रान्सला आणि फ्रान्सवरून पुण्याला हजारो व्यक्तीनी आदरातिथ्याचा अनुभव घेतला असून, हे अनुभव देखील मर्मबंधाची ठेव बनले असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ.सतीश देसाई, भारती भिडे यांनी दिली. 
यावेळी  चंद्रकांत  कुडाळ .रवी  चौधरी ,माणिक  कोतवाल ,डॉ  दीपक  मांडे ,प्रदीप कोपर्डेकर ,नितीन  मेमाणे ,संतोष पाटील,प्रशांत  कोठडीया विणा दीक्षित उपस्थित  होते . 
‘फ्रान्स मित्र मंडळा’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असून, कार्यक्रम मालिकेचा शुभारंभ 10 ऑगस्ट 2016 च्या कार्यक्रमाने होत आहे. या कार्यक्रमात पुण्यातून 20 वर्षांत फ्रान्सला गेलेले तसेच फ्रान्समधून आलेल्यांचे आदरातिथ्य (होस्टिंग) करणारी कुटुंबे, फ्रान्सशी संबंधित कंपन्याही सहभागी होतील.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्यात जबाबदार्‍या विभागून देण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये डॉ सतीश देसाई, भारती भिडे, प्रदीप कोपर्डेकर, डॉ दीपक मांडे, नितीन मेमाणे यांचा समावेश आहे.
या समित्यांच्या 10 बैठका पार पडल्या असून, नोव्हेंबरमधील कार्यक्रमांची निश्‍चिती होत आली आहे. फ्रांसमधून आलेल्या पाहुण्यांना पुण्यातील इतिहास, परंपरांची माहिती देणार्‍या भेटी -गाठी आयोजित करण्यात आल्या असून, पुण्यातील कुटुंबात त्यांचे वास्तव्य असणार आहे.
‘फ्रान्स मित्र मंडळ’ (असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स) च्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी www.affpune.org या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण 10 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमात झाले . तसेच AFF Golden Jubilee Celebration 2016 या नावाने फेसबुकवर पेज निर्माण करण्यात आले आहे. त्यावरही सर्व अपडेट्स दिले जात आहेत.